एका महिन्याच्या बाळाची तीनदा विक्री

Foto
सात आरोपींना ठोकल्या बेड्या; बाळाची हैदराबादमधून सुखरूप सुटका
छत्रपती संभाजीनगर, (छत्रपती संभाजीनगर): मुकुंदवाडी परिसरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जन्मदात्यांनी अवघ्या एका महिन्याच्या बाळाची १ लाख २० हजार रुपयांत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. या बाळाची साखळी पद्धतीने तब्बल तीन वेळा खरेदी-विक्री करण्यात आली असून, अखेर त्याचा सौदा साडेतीन लाख रुपयांत हैदराबाद येथे झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. मुकुंदवाडी पोलिसांनी या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करत आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, रविवारी (दि. २७) बाळाला सुखरूप ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींमध्ये बाळाचे आई-वडील, सीमा रेशवाल, तिची आई कौशल्या पवार, पडेगाव येथील संगीता आव्हाड, तेलंगणातील डॉ. सुरेश गुंटूका आणि हैदराबाद येथील उमा गंगाधर खटकम यांचा समावेश आहे. तपासात समोर आलेल्या
संगीता आव्हाड
माहितीनुसार, सीमाने परिचित असलेल्या संगीता आव्हाड हिला बाळ विक्रीसाठी असल्याचे सांगितले. सरोगसी आणि आयव्हीएफच्या कामानिमित्त संगीताची शहरातील एका नामांकित रुग्णालयात ये-जा होती. तेथे तिची ओळख सुरेश गुंटूका याच्याशी झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश हा बारावी नापास असून, तेलंगणात अनुभवाच्या आधारे मिळवलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे डॉक्टर म्हणून काम करत होता.
सुरेशच्या भावाच्या सासरच्या कुटुंबातील उमा खटकम हिने बाळ घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर संगीता आणि
कौशल्या पवार
कायदेशीर प्रक्रिया करून देण्याचे सांगितले. सुरेशने मध्यस्थी करून बाळ उमाकडे सुपूर्द केले. उमाने तब्बल एक महिना २२ दिवस बाळाचा सांभाळ केला. मात्र, बाळ विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर तिला धक्का बसला. अखेर डॉ. सुरेश गुंटूका आणि उमा खटकम यांनी रविवारी स्वतःहून बाळाला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आणून हजर केले. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतल्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्याला सुरक्षितता व पालनपोषणासाठी 'साकार संस्थे'च्या ताब्यात देण्यात
सीमा रेशवाल
२५ हजारांचा मोबाईल केला खरेदी
बाळाच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांची आरोपींनी आपापसात वाटणी केली होती. सीमाने १ लाख १० हजार रुपये स्वतःकडे ठेवले, तर तिची आई कौशल्या हिला ४० हजार रुपये दिले. हे पैसे उसनवारी फेडण्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. बाळाच्या वडिलांनी मिळालेल्या १ लाख २० हजार रुपयांतून २५ हजारांचा मोबाइल आणि ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले. पोलिसांनी मोबाइल आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, परिमंडळ-२ चे उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहायक आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे, सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे, हवालदार कोल्हे, काळे, खेडकर तसेच डीबी पथकाने केली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions